शहरातील प्रक्रिया न करता येणाऱ्या कचऱ्याचे होणार बायोमायनिंग

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती

*💫मालवण दि.२१-:* मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये असलेल्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करणे व व्यवस्थापन करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. २८ लाख ३४ हजार रुपये खर्चाच्या या कामामुळे शहरातील प्रक्रिया न करता येणाऱ्या कचऱ्याचे बायोमायनिंग म्हणजेच कचरा बारीक करून खत मिश्रित माती वेगळी करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि. प.सदस्य हरी खोबरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, यतीन खोत, मंदार केणी, पंकज सादये, जगदीश गावकर, नितीन वाळके, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, दर्शना कासवकर, शिला गिरकर, सुनीता जाधव, सौ. परब, तृप्ती मयेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर आदी व इतर उपस्थित होते. मालवण नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल एप्रिल २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला. या अहवालात बायोमायनिंग या कामाच्या सुधारित अंदाजपत्रकीय २८ लाख ३४ हजार रक्कमेस मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी सांगली मिरज येथील मिरा स्टील फॅब्रीकेशन ॲण्ड फायबर्सचे सतीश शिवाजी माळी यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. या कामाची मुदत सहा महिने आहे. यामध्ये आडारी डंपीग ग्राऊंड येथील शहरातील प्रक्रिया न करता येणारा साठविलेला कचरा सुमारे 6500 Cum बायो मायनिंग (Bio-Mining) या शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्लास्टीक, काच, दगड, लोखंड, चप्पल, टायर, कपडे, नारळाची करवंटी इत्यादी कचऱ्याचे वर्गीकरण करुन खत मिश्रीत माती वेगळी करण्यात येणार आहे. याचा उपयोग खत म्हणून तसेच डम्पिंग साठी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे काम श्रीवर्धन, खोपोली नगरपरिषद त्यानंतर मालवण नगरपरिषद येथे करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. या कामासाठी लागणारी सर्व प्रकारची मशिनरी आडारी डम्पिंग ग्राउंड येथे बसविण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडमध्ये असलेल्या कचऱ्याचे २६ दिवसात बायोमायनिंग करण्यात येईल असे मिरा स्टील फॅब्रिकेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मालवण नगरपालिकेने सुरू केलेल्या या कामाचे आमदार वैभव नाईक यांनी कौतुक केले.

You cannot copy content of this page