विक्रांत सावंत यांनी घेतली प्रचारात जोरदार आघाडी…

⚡सावंतवाडी ता.०४-:
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून गावागावात नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना विक्रांत सावंत म्हणाले, “याआधी जशी तुम्ही मला साथ दिली, तशीच साथ या निवडणुकीतही मला अपेक्षित आहे. माझ्या गावाच्या आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी मला द्यावी. नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, ते प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन.”
ते पुढे म्हणाले की, “महायुतीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली, याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे. त्यांनी दिलेल्या संधीचे निश्चितच सोने करण्याचा मी प्रयत्न करेन. मात्र, यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तो आशीर्वाद मला द्यावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
महायुतीच्या उमेदवाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता माजगाव मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे.

You cannot copy content of this page