मतदान बंदोबस्तासाठी ५ हजार ७८१ कर्मचारी नियुक्त…

पोलिस अधीक्षक डॉ दहिकर:१०७ पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक यांचा समावेश..

ओरोस ता ४
जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद गट आणि १७ पंचायत समिती गण सदस्य बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या केंद्रांत ६० संख्येने घट झाली आहे. ८१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर तसेच ३८ हजार ४५९ मतदार संख्या कमी झाली आहे. पाच लाख ६१ हजार १०५ मतदार ११५ जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आणि २४४ पंचायत समिती सदस्य उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत आहे. याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी, जिल्हा परिषदेचे ५० गट आणि पंचायत समितीचे १०० गण आहेत. त्यातील ४२ जिल्हा परिषद गटासाठी आणि ८३ पंचायत समिती गणासाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित झालेल्या ८१० मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी आता ५ लाख ६१ हजार १०५ मतदार निश्चित झाले आहेत. त्यात २ लाख ८२ हजार ५८८ महिला आणि २ लाख ७८ हजार ५१६ पुरुष आणि इतर एक अशा मतदारांचा समावेश आहे, असे सांगितले.

५ हजार ३८० कर्मचारी नियुक्त
निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी ५ हजार ३८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात क्षेत्रीय दंडाधिकारी १३४, केंद्राध्यक्ष ८९१, मतदान अधिकारी एक नंबर ८९१, मतदान अधिकारी दोन नंबर ८९१ आणि मतदान अधिकारी तीन नंबर ८९१ असा समावेश आहे. याच बरोबर शिपाई ८७२ नियुक्त करण्यात आले आहेत. व्यवस्थापक ८१० नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची आवश्यकडून प्रशिक्षणे घेण्यात आलेली आहेत. तिसरे प्रशिक्षण ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page