कोलगावात अवतरले बाबा…

⚡सावंतवाडी ता.०३- :
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एका अज्ञात बाबाच्या वावरामुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सदर बाबाचा संशयास्पद वावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

हा बाबा नेमका कोण आहे, तो कोलगाव मतदारसंघात कुठून आणि कशासाठी दाखल झाला आहे, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून मतदारसंघात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून या प्रकरणाचा निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

You cannot copy content of this page