कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी..
⚡ सावंतवाडी, ता. ०४-:
आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगू लागली आहे. कवठणकर यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी असून, आमदार दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मिळणारा ठोस पाठिंबा त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सध्या आरोंदा मतदारसंघात सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी डोअर टू डोअर प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, कार्यकर्त्यांसह नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधताना विकासाचा ठोस आराखडा मांडला जात असून, अनेक वर्षांपासून या भागात अपेक्षित विकास न झाल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“आता परिवर्तन घडवायचं आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत असून, यावेळी सुदन उर्फ सुधा कवठणकर यांना एकतर्फी विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्ते आणि मतदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरोंदा मतदारसंघात कवठणकर यांची आघाडी अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
