*💫कणकवली दि.२१-:* माध्यमिक (इ.८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची विद्यार्थीनी कु. अनुष्का मनिष गांधी हिने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक व तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. तिला न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि खानविलकर कोचिंग अकॅडमी चे खानविलकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान सेक्रेटरी आणि पत्रकार मनिष गांधी यांची ती कन्या आहे.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत फोंडाघाटची कु. अनुष्का मनिष गांधी जिल्ह्यात तिसरी….
