सावंतवाडी येथील बॉम्बे ट्रेडींग दुकानाचे मालक जयंत कुळकर्णी यांचे निधन

सावंतवाडी : सावंतवाडी-जिमखाना येथील रहिवासी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध बॉम्बे ट्रेडिंगचे मालक जयंत बाळकृष्ण कुळकर्णी (५६) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक होते. त्यांनी सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page