शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या डागडुजीसाठी परशुराम उपरकर यांनी उठवला होता आवाज

आताचे आमदार केवळ मंदीर परिसरात फिरुन फोटोसेशन करत फुकाचे घेत आहेत फुकाचे श्रेय

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली टीका

*💫मालवण दि.२१-:* जगातील एकमेव असलेले शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे.या मंदिराची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन विधान परिषदेचे आमदार माननीय परशुराम उपरकर यांनी सन २००८ मध्ये डागडुजी करण्यासाठी आवाज उठवला होता या कामासाठी निधी मंजूर करा अशा प्रकारची मागणी उपरकर यांनी सातत्याने लावून धरली होती. या मागणीची दखल घेत विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी निधी मंजुर करुन काम सुरु करण्याचे आदेश तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांना दिले होते, असे असताना आताचे आमदार केवळ मंदीर परिसरात फिरुन फोटोसेशन करत फुकाचे श्रेय घेत असल्याची टीका मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. तटकरे यांनी १ कोटीचा निधी मंजुर केला होता. हा निधी मंजूर केल्यानंतर सदर कामास पुरातत्व खात्याने विरोध केला होता यावेळी सर्व अडचणी समजून घेऊन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर निधी मंजूर झाल्यानंतर हे काम पुरातत्व खात्याचे की सार्वजनिक बांधकाम खात्याचे या गोंधळामुळे अडकले होते.या सर्व बाबी विधिमंडळाच्या पटलावर आजही आहेत. तत्कालीन सां.बा. कार्यकारी अभियंता भावे यांनीही मंदिराच्या कामाच्या डागडुजीसाठी प्रयत्न केले होते. असे असताना आताचे आमदार केवळ मंदीर परिसरात फिरुन फोटोसेशन करून फुकाचे श्रेय घेत आहेत, अशी टीकाही इब्रामपूरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page