*💫वेंगुर्ला दि.२०-:* वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने शासकीय किमत भात खरेदी योजना २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ सोमवार २३ नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प येथील गोदामस्थळी होणार आहे. खरेदी-विक्री संघाच्या श्रीदेव रामेश्वर मंदिर नजिकच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुनच भात खरेदीसाठी केंद्रावर आणावे. त्यासाठी सातबारा मुळप्रत, बँक पासबुक, खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, बँक खाते क्रमांक स्पष्ट दिसतील असे कागदपत्र सोबत आणावे. भात खरेदीचा वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) केली जाणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी संघाकडे भात खरेदीसाठी भात आणावे. तसेच तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, गटसचिव व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी केले आहे.
वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघातर्फे २३ रोजी भात खरेदीचा शुभारंभ….
