स्थानिकांनी कारवाईला विरोध करत घेतला आक्रमक पवित्रा
*💫सावंतवाडी दि.२०-:* संत गाडगेबाबा मंडईला लागून असलेल्या स्टॉलवर पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आल्याने बाजारपेठेत वादंग निर्माण झाला. यावेळी स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. गेली १५ वर्षे आपण रक्षाबंधन, दिवाळी आदी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची परवानगी घेऊन याठिकाणी स्टॉल उभारतो. दिवसाला शंभर रुपयांची पावती फाडून कायदेशीर रित्या व्यवसाय करतो. दरम्यान, कोरोनात आर्थिक संकटात सापडल्यामुळे स्टॉल चालविण्यासाठी द्यावे, अशी मागणी स्टॉलधारकांनी पत्राद्वारे पालिका प्रशासनाकडे केली. मात्र, या पत्राला प्रतिक्रिया न देता पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी संबंधित स्टॉलकडे दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी कारवाई करणार तर सर्वांवर करा, अनधिकृत स्टॉल उभारताना कुठे असता, असा सवाल करत स्थानिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तर हिंदू धर्मियांची संस्कृती जपणारे साहित्य नेण्यासाठी पालिकेनं कचऱ्याची गाडी आणल्यानं नागरिक संतप्त झाले. यावेळी शब्बीर मणियार, बबलु मिशाळ यांनी आक्रमक होत कारवाई करू दिली नाही. तर राष्ट्रवादीचे उद्योग वव्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरज खान यांनी या कारवाईला विरोध केला. स्थानिकांना दिला जाणारा त्रास सहन करणार नाही. या करवाईबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन विचारणा करणार अस मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केल. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे ट्राफिक देखील जाम झाल होत.