पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो…

संजू परब: आमदार केसरकर यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून वाहिली श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.०७-: पक्षासाठी तळमळने काम करणारा आणि सर्वांसोबत हसत मुखाने वागणारा प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर याच्या अकाली निधनाने मनाला अतिव दुःख झाले आहे, त्याच्या निधनाने पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो अशा शब्दात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

येथील माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे खासगी स्विय सहाय्यक असलेल्या नंदू शिरोडकर यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या अकाली निधनाने शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख श्री परब बोलत होते त्यांच्यासोबत व्यासपीठावर महिला जिल्हाप्रमुख अॅड.निता सावंत, अशोक दळवी, महिला शहर प्रमुख भारती मोरे आधी उपस्थित होते.
श्री परब म्हणाले, शिंदे शिवसेनेमध्ये आपण कार्यरत झाल्यापासून नंदू शिरोडकर यांचे काम पाहिले आहे पक्षासाठी नेहमी तळमळणारा, सर्वांशी आदराने वागणारा म्हणून त्यांची ओळख होती. सरळ आणि साधे व्यक्तिमत्व असलेल्या म्हणून त्याच्याकडे पाहिजे जात होते पक्षाबरोबरच दीपक केसरकर यांना मानणारा त्यांचा खंदा समर्थक म्हणूनही ते परिचित होते त्यांच्या अशा अकाली एक्झिट ने आम्ही एका सच्चा कार्यकर्त्याला उपयोग त्यांच्या आत्म्याला सदैव चिरशांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आम्ही सदैव राहू.
श्री दळवी म्हणाले, नंदू शिरोळकर यांनी व्यापार व्यवसायासोबतच समाजकारणही अंगीकारले होते, आमदार दीपक केसरकर यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाळतो त्यांचे व्यक्तिमत्व समाजासाठी पोषक सर्वांचे तो आदराने बागायत होता त्यांच्या अकाली निधनाने आम्हा सर्वांना अति दुःख झाले आहे, पक्षाच्या सर्व कार्यक्रमात तळमळीने पुढे असणारा नंदू यापुढे आम्हाला दिसणार नाही हे विचार करूनच खूप दुःख होते, त्यांची आठवण आमच्या सदैव स्मरणात राहील.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिले या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर ,विश्वास घाग, मिरा सिंग ,पूजा नाईक, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, अर्चित पोकळे, आबा केसरकर, सुरेश शिरोडकर,नरेंद्र मिठबावकर, शिल्पा मेस्त्री, महादेव राऊत, वैशाली सुभेदार, दादा राऊळ, दत्ता सावंत, गजा सावंत, सुमित कोरगावकर, लक्ष्मण भालेकर ,प्रशांत साठेलकर, समीर पालव, आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

गिरीश नाटेकर यांनाही वाहिली श्रद्धांजली..
शिंदे शिवसेना पक्षाचे बांदा शहर प्रमुख गिरीश नाटेकर यांचेही आणि कडेच निधन झाले कै.नाटेकर यांनीही पक्षासाठी तळमळीने काम केले आहे आजच्या या कार्यक्रमात पक्षाच्या माध्यमातून त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

You cannot copy content of this page