⚡सावंतवाडी ता.०६-: प्रतिवर्षी प्रमाणे संदिप गावडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी देखील श्री गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. प्रथम आंबोली जिल्हापरिषद मतदार संघात वाह्यापटप पूर्ण करण्यात आले.
व आता संपूर्ण माडखोल जिल्हापरिषद मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होणे फार महत्वाचे आहे हाच उद्देश समोर ठेऊन मोफत वह्या वाटप उपक्रम दरवर्षी आम्ही राबवित असतो. अनेक कंपिटेटिव्ह स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्या दृष्टीने अभ्यास करावा अशी माझी ईच्छा आहे आणि हेच डोळ्यासमोर ठेऊन यावर्षीची वाह्यांची थीम देखील आम्ही देशातील विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षा अशी ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक मुलांना देखील सहकार्य करण्यास मला आनंद होईल असे श्री गावडे म्हणाले. यावेळी माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपस्थित होते.