⚡सावंतवाडी ता.०७-: मुक्ताई ॲकेडमीने शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी कॅरम आणि बुदधिबळ कोचिंग वर्कशॉपचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या शालेय स्पर्धेच्या आणि ॲकेडमीच्या स्पर्धेच्या तयारीसाठी हे वर्कशॉप घेण्यात येत आहे. सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या हाॅलमध्ये रविवार दि.13 जुलै रोजी सकाळी 09:30 ते दुपारी 01:30 या वेळेत वर्कशॉप घेण्यात येईल. श्री.कौस्तुभ पेडणेकर सर कॅरमचे आणि राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर बुदधिबळचे कोचिंग करणार आहे.
नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे.
सावंतवाडीत रविवारी विदयार्थ्यांसाठी कॅरम आणि बुदधिबळ कोचिंग वर्कशॉप…
