मालवणमध्ये श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन संपन्न…

⚡मालवण ता.१५-:
मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथून आणलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

चोळप्पा महाराज यांचे वंशज श्री वेदमूर्ती नितीन महाराज यांच्याकडून ब्राह्मण वृंद यांनी स्वामी समर्थ यांच्या चर्म पादुका ऍड. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आणून पूजन केले. सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत पादुकांचे विधिवत पूजन संपन्न होऊन दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळपर्यंत भाविकांनी उपस्थित राहून पादुका दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ऍड उल्हास कुलकर्णी, ऍड. प्राची कुलकर्णी, ऍड. अमेय कुलकर्णी यांसह कुलकर्णी कुटुंबीय व इतर भाविकगण उपस्थित होते.

You cannot copy content of this page