Headlines

कसाल येथील फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. प्रशांत कोलते यांना पित्रृशोक

सेवानिवृत्त पोष्टमास्तर राजाराम कोलते यांचे निधन..

⚡वैभववाडी ता.१५-: करुळ गावचे रहीवाशी व सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम गंगाराम कोलते वय 84 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. फुफ्फुसविकार विशेषज्ञ डॉ. प्रशांत कोलते तसेच वैभववाडी येथील स्वरगंगा इलेक्ट्रिशियन चे मालक संतोष कोलते यांचे ते वडील होत.
राजाराम कोलते यांनी भारतीय पोस्ट खात्यात तब्बल तीस वर्ष सेवा बजावली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा व गडहिंग्लज या ठिकाणी त्यांनी काम केले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर करुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो : राजाराम कोलते

You cannot copy content of this page