Headlines

कसाल केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा चेतना मेळावा उत्साहात…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे आयोजन..

⚡कुडाळ ता.१६-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या वतीने शनिवारी कुडाळ तालुक्यातील कसाल केंद्रामध्ये केंद्रस्तरीय चेतना मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे पूर्ण नियोजन केंद्र संघटक संतोष तेरसे सर व त्यांच्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्कृष्टरित्या केले.
केंद्रस्तरीय मेळाव्यामुळे सर्व शिक्षकांशी तालुका संघटनेचा संपर्क अधिक दृढ व भक्कम झाला. शिक्षकांच्या समस्या तालुका संघटनेला जाणून घेता आल्या, तसेच त्यांच्या समस्यावर मार्गदर्शनही करता आले. कसालचे केंद्र संघटक संतोष तेरसे सर यांनी तमाम केंद्रांना आदर्श घालून दिला आहे. त्यांचे संघटनेने अभिनंदन व आभारही मानले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी दिली.
या मेळाव्यास ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, तालुका अध्यक्ष शशांक आटक ,राज्य कार्यकारिणीसदस्य सचिन मदने, तालुका प्रवक्ते संतोष वारंग, शिक्षक नेते प्रसाद वारंग, महिला आघाडी अध्यक्ष संजना पेडणेकर, सचिव सुगंधा अणावकर, शिक्षक पतपेढी संचालक विजय सावंत, संजयजी गावडे , जिल्हा कार्यकारणी सदस्य गोपाळ गावडे, आप्पा सावंत, देवगड तालुका जेष्ठ मार्गदर्शक मिराशी सर, कार्याध्यक्ष महेश कुंभार, माजी सचिव स्वामी सावंत, दत्ता तवटे, बागवे सर, आबा पाताडे, कसाल बालमवाडी शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर, केंद्रातील सर्व समिती पाईक उपस्थित होते.
मेळाव्याप्रसंगी विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग श्रीम.वर्षा परब, विषय व्यक्ती अभ्यास जिल्हास्तरीय निपुण साहित्य श्रीम.मानसी सावंत आणि श्रीम.झोरे मॅडम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चेतना मेळाव्याचे प्रास्ताविक केंद्रसंघटक संतोष तेरसे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी केंद्रातील सदस्य यांच्या समस्या उपस्थित पदाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. कार्यक्रमाचे निवेदन काशीराम नाईक यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. धनश्री झोरे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून चेतना मेळाव्याची सांगता केली. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे कसाल केंद्राचे केंद्रसंघटक संतोष तेरसे यांनी दिली.

You cannot copy content of this page