साखळी गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न:श्रुती सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारची विद्यार्थिनी..
कुडाळ : साखळी, गोवा येथे झालेल्या सम्राट संगीत सितारा २०२५ या शास्त्रोक्त गायन स्पर्धेच्या १९व्या पर्वात कुडाळ येथील श्रुती शरद सावंत हि अंतिम फेरीत विजेती ठरली आहे. श्रुती हि सावंतवाडी यथील रघुकुल स्वरविहारची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
साखळी, गोवा येथे सम्राट संगीत सितारा २०२५ या शास्त्रोक्त गायन स्पर्धेच्या १९व्या पर्वाची अंतिम फेरी रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कुडाळ येथील श्रुती शरद सावंत ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. अंतिम फेरीचे परीक्षण विदुषी अल्का देव मारुलकर यांनी केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी सावंतवाडी येथे झाली होती. तसेच कुडचडे, गोवा येथील पुढील फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ६ स्पर्धकांमध्ये श्रुतीचा समावेश होता.
श्रुती सावंत हि सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांच्याकडे शास्त्रोक्त गायन शिकत असून कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्रामध्ये पं. डॉ. समीर दुबळे, पुणे यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे पुढील शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.