Headlines

कणकवलीत उड्डाणपुलाखाली बाजार भरविण्याच्यादृष्टीने कार्यवाहीला सुरूवात

बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण *⚡कणकवली ता.०४-:* महामार्ग चौपदरीकरणात कणकवलीत उड्डाणपुलाखाली यावर्षी बाजार भरण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतच्यावतीने गणेशोत्सव कालावधीचे नियोजन करण्यात आल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. यात प्रामुख्याने कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण करण्यात आले. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना दुकाने मांडण्यासाठी जागा आखून देण्यात…

Read More

१२ महिन्यांपासून अनधिकृतपणे वीज चोरीचा प्रकार झाला उघड

कणकवलीत १ लाख ३८ हजाराची विज चोरी; पोलिसात गुन्हा दाखल *⚡कणकवली ता.०४-:* मागील १२ महिन्यांपासून अनधिकृतपणे वीज चोरीच्या उद्देशाने मिटर बायपास करून ७ हजार ७७ युनिटची म्हणजेच १ लाख ३८ हजार ५७८ रुपये किंमतीची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.कणकवली शहरातील कांबळे गल्ली रोडवरील आईस्क्रिम पार्लर दुकान असलेल्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याची बाब…

Read More

शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत-पालव यांना पितृशोक

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक भिरवंडे पुनाळवाडी येथील व सध्या कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर विष्णू सावंत( वय ८३) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत – पालव यांचे ते वडील होत. शिरवल येथील प्राथमिक शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित…

Read More

अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभाग आक्रमक

नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त *⚡कणकवली ता.०४-:* अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभाग आक्रमक झाला असून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे.नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.या प्रकरणी फीरोज साटविलकर रा.नांदगाव व कादीर आब्दूल नावळेकर रा.नांदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभागाने…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 378.8940 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.69 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 18.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 77.9780, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32 (3188), सावंतवाडी…

Read More

पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या विलवडेतिल त्या कुटुंबाना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली मदत सुपूर्द *⚡सावंतवाडी ता.०३-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून विलवडे येथील ३० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत विलवडे गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली‌. पुर परिस्थितीमुळे या गावातील लोकांच नुकसान झाले होते. आज…

Read More

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज डिप्लोमाचा 100% निकाल

*⚡कणकवली ता.०३-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलच्या प्रथम वर्षी डिप्लोमाचा ९९ टक्के तर द्वितीय वर्षी डिप्लोमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम वर्षातील पहिले ३ क्रमांक पुढील प्रमाणे आहेत १. सबीना फकीर (९०.०९%) २. यश मिसाळ (८६.०९%) ३. सोहम…

Read More

प्राथमिक शिक्षक संघ देणार जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका

६ रोजी वितरण सोहळा ओरोस-:अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने ९ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. याचा लोकार्पण सोहळा ६ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा राज्य सल्लागार प्रकाश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे, अशी…

Read More

मालवण शहरात गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विविध कामे सुरू;

नगराध्यक्षांकडून कामांची पाहणी *⚡मालवण ता.०३-:* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडी कटाई आदी व इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची पाहणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी करत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कामांच्या पाहणी वेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या समवेत बांधकाम सभापती मंदार केणी, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मालवण शहरातील रस्त्यावर…

Read More
You cannot copy content of this page