*💫कणकवली दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विज बिल माफी करणार अशी घोषणा करून आणि ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली त्याविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे त्यानंतर जो राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केली जातील, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्यातील अवैद्य धंदे याबाबत निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे येत्या काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल .त्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे खळखट्टाक आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील माणसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, मनविसे जिल्हाध्यक्ष कृनाल किंनळेकर,तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवडकर,विनोद सांडव,सुनील गवस,चंदन तेली,सनी बागकर,विनायक गावडे,राजू गुरव आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी बैठक झाली.सरकारला सोमवारपर्यत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे.सोमवारी राज ठाकरेनी आदेश केल्यानंतर मोर्चा किंवा अन्य आंदोलन केले जाईल.हे वीज बिल माफी आंदोलन जनतेला घेऊन केले जाईल,असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला. सिंधुदुर्गात झालेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिले होते त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.गोवा बनावट दारु, मटका, जुगार,अवैद्य गुटखा विक्री होत आहे.त्यावर निवेदन देऊनही हे अवैध व्यवसाय चालूच आहे.जर कारवाई होत असेल तर चिपळूणला जिल्हातील २१ लाखाचा गुटखा कसा मिळाला?ती गाडी नाका चौकी प्रार करत कशी पोहचली?.मग पोलीस,दारूबंदी विभाग, पोलीस नाकी व सीसीटीव्ही काय करताहेत? साडेचार कोटी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पोलीस विभागामार्फत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.त्याचा उपयोग केव्हा होणार असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे. गोवा बनावटीच्या दारुची विक्री करणाऱ्यांना साथ पोलीस देत आहे.तसेच अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे गोव्यात ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे. यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी व आरटीओ यांना भेटून ओव्हरलोड गोव्यात जाते कशी?सीसीटीव्ही लावले आहेत? त्याठिकाणी तपासणी का होत नाही? दारु आणि गुटख्याची मेन सेंटर बाद्यात आहेत.त्याबाबत आम्ही आवाज उठवत आहोत.पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसे कार्यकर्ते धाडी टाकतील. लाईट बिल आंदोलन झाल्यानंतर अवैध धंद्याविरोधात आंदोलन करणार आहोत,असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात आंदोलने मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली माहिती
