सावंतवाडी येथे २४ नोव्हेंबर रोजी भात खरेदीचा शुभारंभ….

💫सावंतवाडी दि.२०-: शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडी माठेवाडा येथील भात खरेदी केंद्रावर होणार आहे.

यावर्षी भात खरेदीकरिता शासनाने प्रतिक्विंटल १८६८ रूपये एवढा दर जाहीर केला आहे. शेतकºयांनी भात विक्रीस आणतेवेळी भात पिकाखालील आवश्यक क्षेत्राचा अद्यावत सातबारा, बँकेच्या सेव्हिंग पासबुकची व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी. पासबुकच्या झेरॉक्समध्ये बँकेचे नाव, आयएफसी कोड व खाते क्रमांक स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. भात खरेदी आॅनलाईन असल्यामुळे संबंधित शेतकºयांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच भातापोटी मिळणारी रक्कम शासनाकडून परस्पर बँक खात्यात जमा होणार आहे. सावंतवाडी तालुक्यासह खरेदी-विक्रीमार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, कोलगाव, मडुरा, डेगवे व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तरी या योजनेचा सर्व शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबल ठाकूर व उपाध्यक्ष अरुण गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page