आंबोली तलाठी घाडीगावकर यांचे जिल्हापरिषदेसमोर १० जुलैला उपोषण …

महसूल विभागाच्या अन्यायविरोधात चौकशीची मागणी..

⚡आंबोली ता.०५-: नियमाप्रमाणे प्रामाणिक काम करत असताना महसूल आकसाने कारवाई करत वेतन थांबवून अन्यायी कारवाई केल्याने प्रशासनाविरोधात १० तारिखला जिल्हापरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा तलाठी सुमित घाडीगावकर यांनी दिला आहे.

आंबोली सजाचे तलाठी सुमित घाडीगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आंबोली आणि गेळे (ता. सावंतवाडी) येथील ग्रामस्थांकडून तलाठी श्री. सुमित बाबू घाडीगांवकर यांच्या प्रामाणिक सेवा करत असताना कोणत्याही ग्रामस्थांची आपल्याविरुद्ध तक्रार नाही.आपण मा.उच्च न्यायालय आणी शासनाच्या जी आर नुसार् वेळोवेळी निर्देशानुसार सर्व कामकाज केले आहे.तसे अहवाल कार्यालयाला वेळोवेळी सादर केले आहे.अतिक्रमन तसेच बेकायदेशीर कामाची माहिती शासनाला कळवली आहे. मात्र वरिष्ट कार्यालयाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.वरिष्ट प्रशासनाने आपली जबाबदारी पार पडताना कसूर केलेली असताना उलट महसूल प्रशासनाने आपल्यावरच आकसाने कारवाई करून पगार थांबविल्याने आपल्यावर उपास मारीची आत्महत्येची वेळ आणली आहे.प्रशासनाच्या निस्क्रिय भूमिकेमुळे अतिक्रमन करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.तसेच या ठिकाणी मा.उच्च न्यायालय आणी सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशाच्या शर्तीचा देखील भंग होत आहे. वरिष्ट प्रशासनाने मी सादर केलेल्या अहवाला वर कोणतीच कारवाई केलेली नाही.उलट माझ्यावरच शिस्तभंगाची कारवाई म्हणून वेतन थांबवण्याची अन्यायी कारवाई केली आहे.त्यामुळे प्रामाणिक सेवा म्हणून माझ्यावर हा शासनाचा अन्याय आहे.या बद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आपल्या कार्यकाळात कधीही लाच मागितली नाही किंवा कोणाची आर्थिक फसवणूक केली नाही. कोणत्याही नागरिकाची एकही तक्रार नाही.
यापूर्वी कलंबिस्त गावातही अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम केले आहे. आंबोली आणि गेळे येथे कार्यरत असताना त्यांनी कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांना प्रश्न सुटण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यांच्या या कामामुळेच प्रभावित होऊन आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी मा. महसूल मंत्री तसेच मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदन देऊन श्री. घाडीगांवकर यांना आंबोली सज्जातच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत महसूल प्रशासनाने आंबोली सज्जात न ठेवता, उलट पगार थांबवून उपासमार केली आणि अन्याय कारक कारवाई केल्याचे घाडीगांवकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून जिल्हा प्रशासनाकडे करून १० जुलै रोजी जिल्हापरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page