मोहिनी मडगावकर यांचा आरोप: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच वेधले निवेदनद्वारे लक्ष..
सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर कटरने फाडल्याचा आरोप भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केला. याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे लक्ष वेधलं. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अज्ञाताचा शोध घेण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षकांनी दिले.
भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या अभिनंदनाचे बॅनर तसेच गवळी तिठा येथील पालकमंत्री नितेश राणे यांचा बॅनर फाडल्याचे मोहिनी मडगावकर यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अज्ञाताचा शोध घेण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले. यावेळी सौ मेघना साळगावकर उपस्थित होत्या