पावणाई देवी महिला दूध उत्पादित संस्थेचा स्तुत्य उपक्रम.
*💫मालवण दि२०-:* विश्वासाने आज मसुरे परिसरातील दूध उत्पादित शेतकऱ्यांना एक प्रकारे रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादन संस्था मसुरे चे कार्य व आदर्श आज सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे भविष्यातही या संस्थेमार्फत गरजू शेतकऱ्यांना पाळीव जनावरे घेण्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या पावणाई देवी महिला दूध उत्पादन संस्थेचा लाभ येथील दूध उत्पादित शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असे मसुरे येथे बोलताना मसुरे पोलीस दूरक्षेत्र पोलीस अधिकारी श्रीयुत प्रमोद नाईक यांनी सांगितले.. मसूरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे या संस्थेच्या वतीने येथील शेतकऱ्यांना वार्षिक बोनस वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा बोनस ६० लाभार्थी दूध उत्पादित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला.गेली अनेक वर्षे ही संस्था शेतकऱ्यांना लाभ बोनस वाटप देत आहे. यामध्ये अनुक्रमे पहिले तीन क्रमांक सतीश बांदिवडेकर महेंद्र हिर्लेकर, अभी घाडीगावकर यांनी पटकाविले होते. यावेळी संस्थेच्या उद्दिष्ट कार्य याविषयी डॉक्टर विश्वास साठे यांनी सर्व उपस्थित शेतकर्यांना संस्थेच्या कामकाजाविषयी आणि आणि शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठा विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादन करून आपली आर्थिक उन्नती साधावी ज्या शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा आर्थिक गरज लागेल त्यावेळी ही संस्था या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन डॉक्टर विश्वास साठे यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस विवेक फरांदे, हरीश जायभाय, प्रमोद बागवे, विशू तोंडवळकर, बाबू दुखंडे, हिरवा तोंडवळकर, हनुमंत प्रभू, गणेश बागवे, मिर मुबारक, स्वप्नील ठाकुर, फर्नांडिस, प्रणित बिल ये, मुकेश मुळ्ये, संतोष राणे, प्रमोद शिंगरे, प्रशांत परब, किरण पवार, नाना पवार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. गेली अनेक वर्ष ही संस्था येथील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बोनस वाटप आणि योग्य ते सहकार्य करत आहे. कार्यक्रमाचे आभार प्रमोद बागवे यांनी मानले. प्रास्ताविक डॉक्टर साठे यांनी केले यावेळी या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी लाभार्थी सर्व शेतकऱ्यांनी या संस्थेचे आभार व्यक्त केले…