*💫मालवण दि.२०-:* प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आशिष मुकुंद नाबर यांची नियुक्ती करण्यात आलं आहे.प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना सहजतेने कार्यान्वित करण्यासाठी तसेच अनेक प्रभावी योजनांना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी आशिष नाबर यांची निवड झाली आहे. मालवण तालुक्यात प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आशिष नाबर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुशेष आर्य, राष्ट्रीय महामंत्री डॉ. मुकेश शर्मा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवान बागुल यांच्या स्वाक्षऱ्या असलेले नियुक्ती पत्र नाबर यांना देण्यात आले आहे. या निवडी बद्दल त्यांचे मालवणात अभिनंदन होत आहे.
प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आशिष नाबर यांची नियुक्ती
