सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक राजेद्र दाभडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी शहरात कारवाई मोहीम

५५ वाहन चालकांवर कारवाई : १८,८०० रुपयांचा दंड वसूल

* सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक राजेद्र दाभाडे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटिल, जिल्हा वाहतूक शाखाचे पोलिस निरीक्षक श्री भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात कारवाई मोहिम राबवण्यात आली. यात आज दिवसभरात शहरात ५५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून १८,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात बिना लायसन्स, काळ्या काचा, ट्रीपल सीट आदी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या मोहिमेत सहाय्यक पोलिस फौजदार घाडी, पोलिस हवालदार हडकर, पोलिस हवलदार आरोलकर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page