राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण व कुळकरवाडी पायवाट कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

*💫मालवण दि.२०-:* मालवण तालुक्यातील राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण , व राठिवडे कुळकरवाडी पायवाट या कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हानियोजनच्या जनसुविधा योजनेअंतर्गत राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरणासाठी ८ लाखाचा निधी तर आमदार स्थानिक विकास निधीतून राठिवडे कुळकरवाडी पायवाटेसाठी ३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी आ. वैभव नाईक यांनी राठिवडे येथील विकास कामांचा आढावा घेतला. जी प्रलंबित विकास कामे आहेत ती येत्या काळात मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.तसेच ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, पंकज वर्दम, बंडू चव्हाण,पोईप विभागप्रमुख विजय पालव, राठिवडे सरपंच मंजुषा धुरी, उपसरपंच सचिन धुरी, सदस्य स्वप्नील पुजारे, प्रकाश मेस्त्री, आरती मेस्त्री, वैशाली धुरी, सुभाष धुरी, ग्रामसेवक सी. पी. सडविलकर, बंडू गावडे, गंगाराम धुरी, सचिन कुमामेकर, युवराज मेस्त्री, जयराम धुरी, विनायक चव्हाण, अनंत पाताडे, जितेंद्र धुरी, दीपक धुरी, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश धुरी, किरण धुरी, रघुवीर धुरी, प्रदीप धुरी, आदीसह राठिवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page