ताज ऑटोकेअर आणि सर्व्हिसिंग सेंटरच्या नव्या दालनाचे शानदार उद्घाटन

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत ताजुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *💫सावंतवाडी दि.११-:* शहरात गेली १५ वर्षाहून अधिक वर्ष लोकांना प्रामाणिकपणे सेवा देणारे सावंतवाडीतील प्रसिद्ध *”ताज ऑटोकेअर आणि ॲक्सेसरीज सेंटर”* हे नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. या दालनात एकाच छताखाली गाड्यांचे सुशोभिकरण करण्यासाठी लागणारे *हायटेक* कंपनीचे दर्जेदार साहित्य उपलब्ध होणार आहे….

Read More

कोल्हापूर येथील ट्रक चालकावर सावंतवाडीत जीवघेणा हल्ला

*💫सावंतवाडी दि.१२-:* कोल्हापूर हुन सावंतवाडीत आलेल्या एका ट्रक चालकावर सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाजवळ चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. त्या युवकाच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याच्या शरीरावर गंभीर जख्मा असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबूळी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे मत्स्य पालन व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

*💫मालवण दि.११-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद भवन ट्रस्टच्या वतीने आणि मुळदे कृषी संशोधन केंद्र कुडाळ यांच्या सहकार्याने उद्या दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुळदे कृषी संशोधन केंद्र येथे जिल्ह्यातील युवकांसाठी शोभिवंत मत्स्य पालन व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोरोना नंतरचे कृषी व कृषी संलग्न व्यवसायातील संधी…

Read More

*वॉटर स्पोर्टसवर बंधर विभाग करत असलेली कारवाई चुकीची

आमच्या समस्या सोडवा अन्यथा बंदर कार्यालयातच ठिय्या आंदोलन छेडण्याचा व्यवसायिकांचा इशारा *💫मालवण दि.११-:* मालवणच्या किनाऱ्यावर सुरू असलेले वॉटर स्पोर्ट्स हे अनधिकृतरित्या सुरू असल्याचे सांगत मालवणच्या बंदर विभागाने आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगरल्याने संतप्त बनलेल्या वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक प्रतिनिधीनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वॉटरस्पोर्ट्स चालू करणेबाबत बंदर विभागानेच आम्हाला परवानगी दिली असून…

Read More

सेवांगणतर्फे लघुपट रसग्रहण स्पर्धा संपन्न

*💫मालवण दि.११-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवणतर्फे लघुपट रसग्रहण स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ‘सत्यारंभ’ या लघुपटाचे स्पर्धकांनी रसग्रहण केले. यामध्ये साक्षी देसाई, डॉ. नितीन पवार, सुनील माळवदे, गुरुनाथ ताम्हणकर, मकरंद वायंगणकर, विजय चौकेकर, प्रतिभा बोर्डे, पूजा सावंत, साहिल भोसले, सोहम बाबरेस, नेहा शिंगरे प्राची दळवी, वैजयंती करंदीकर, ईशा राणे, वृषाली करंजेकर, मायलीन फर्नाडिस, तिलोत्तमा…

Read More

नाधवडे ब्राह्मणदेववाडी प्रशालेत वर्ग खोल्या दुरुस्तीचा शुभारंभ

*💫वैभववाडी दि.११-:* विद्या मंदिर नाधवडे नवलादेवीवाडी, ब्राह्मणदेववाडी प्रशालेच्या मंजूर असलेल्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, पं. स. सभापती अक्षता डाफळे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, बाप्पी मांजरेकर,…

Read More

माथाडी जनरल कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद मसुरकर

*💫कणकवली दि.११-:* महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी शहरातील शिवसैनिक प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत व संघटनेचे सेक्रेटरी राजेश महाडिक यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. माथाडी जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पाभाई पराडकर यांनी हे नियुक्ती पत्र नुकतेच देत प्रमोद मसुरकर…

Read More

भाजपतर्फे मालवण – कसाल रस्त्यावर आज खड्डे पूजा आंदोलन….

*💫मालवण दि.११-:* मालवण कसाल रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा व त्याकडे सत्ताधाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष याच्या विरोधात मालवण तालुका भाजपच्या वतीने दि. १० डिसेंबर रोजी खड्डे पूजा हे अनोखे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे निधन झाल्याने स्थगित केलेले हे आंदोलन उद्या दि. १२ डिसेंबर रोजी मालवण- कसाल रस्त्यावर कुणकवळे येथे सकाळी…

Read More

वैभववाडीत तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील अन्य 3 पॉझिटिव्ह *💫वैभववाडी दि.११-:* वैभववाडी तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.शुक्रवारी 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती आढळल्या आहेत.सर्व रुग्णांची प्रकृती बरी आहे. 2 पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णांलय ओरोस येथे उपचार सुरू आहेत.तर अन्य 10 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. हेत व गडमठ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात…

Read More

कोव्हिडमुळे जनता त्रस्त असताना तुम्ही दंड कसले आकारता….

मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा महसूल विभागास सवाल *💫सावंतवाडी दि.११-:* तालुक्यात बिनशेती न करता ज्यांनी घर बांधली अशा घरांवर बिनशेती करण्यासाठी सावंतवाडी महसूल कडून कारवाई सुरू झालेली आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी घरांची मोजमापे घेऊन त्यांना नोटिसा बजावत आहेत. मागचे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि आताचे सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी निवडणुका आल्या…

Read More
You cannot copy content of this page