*💫सावंतवाडी दि.१२-:* कोल्हापूर हुन सावंतवाडीत आलेल्या एका ट्रक चालकावर सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाजवळ चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. त्या युवकाच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याच्या शरीरावर गंभीर जख्मा असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतु हा हल्ला कोणी व का केला याबाबत माहिती प्राप्त झाली नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
कोल्हापूर येथील ट्रक चालकावर सावंतवाडीत जीवघेणा हल्ला
