राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे मत्स्य पालन व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

*💫मालवण दि.११-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद भवन ट्रस्टच्या वतीने आणि मुळदे कृषी संशोधन केंद्र कुडाळ यांच्या सहकार्याने उद्या दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुळदे कृषी संशोधन केंद्र येथे जिल्ह्यातील युवकांसाठी शोभिवंत मत्स्य पालन व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोरोना नंतरचे कृषी व कृषी संलग्न व्यवसायातील संधी म्हणून ही कार्यशाळा युवकांना महत्वाची ठरणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शरद भवन ट्रस्ट चे विश्वस्त व्हिक्टर डान्टस यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page