*वॉटर स्पोर्टसवर बंधर विभाग करत असलेली कारवाई चुकीची

आमच्या समस्या सोडवा अन्यथा बंदर कार्यालयातच ठिय्या आंदोलन छेडण्याचा व्यवसायिकांचा इशारा

*💫मालवण दि.११-:* मालवणच्या किनाऱ्यावर सुरू असलेले वॉटर स्पोर्ट्स हे अनधिकृतरित्या सुरू असल्याचे सांगत मालवणच्या बंदर विभागाने आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगरल्याने संतप्त बनलेल्या वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक प्रतिनिधीनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वॉटरस्पोर्ट्स चालू करणेबाबत बंदर विभागानेच आम्हाला परवानगी दिली असून जिल्हाधिकारी यांनी कोरोना खबरदारी नियमावलीही आम्हाला दिली असताना चुकीच्या पद्धतीने बंदर विभाग आमच्यावर कारवाई करत आहेत ही चुकीची गोष्ट असून याप्रश्नी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी उद्या शनिवार दि १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण बंदर कार्यालयात उपस्थित होत आमच्या समस्या सोडवाव्यात. अन्यथा बंदर कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण येथील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांनी बंदर विभागास निवेदनाद्वारे दिला आहे. काही दिवसांपूर्वी वॉटरस्पोर्ट्स बंदीचे आदेश देत बंदर विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी बंदर मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतल्यावर त्यांनी वॉटरस्पोर्ट्स चालू करण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली जाहीर करणार असल्याचे सांगीतले. या पार्श्वभूमीवर आज बंदर अधिकारी किनाऱ्यावर पुन्हा कारवाईसाठी गेले असता संतप्त बनलेल्या मालवण, दांडी, चिवला बीच व देवबाग येथील वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक प्रतिनिधीनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर व अमोल ताम्हणकर यांना जाब विचारला. यावेळी रुपेश प्रभू, राजन कुमठेकर, स्वप्नील मोंडकर, अभिनय चोपडेकर, कन्हया तांडेल, अन्वय प्रभू, वैभव खोबरेकर, रश्मीन रोगे, मनोज मेथर, फ्रान्सिस फर्नांडिस यासह अन्य उपस्थित होते. जलक्रीडा बाबत आमच्याकडे सर्व परवानगी आहेत. दरवर्षी नूतनीकरण स्वरूपात दिली जाणारी परवानगी आम्ही यावर्षी २० नोव्हेंबरला घेतली. त्याची मुदत २५ मे आहे. परवानगी देतेवेळी आम्हाला कोरोना खबरदारी नियमांचे पालन करणेबाबत अट घालण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाचे आपत्ती विभागाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग के मंजुलक्ष्मी यांनी आम्हाला कोरोना खबरदारी नियमावली दिली. त्यानुसार व्यवसाय सुरू असताना केवळ आम्हाला त्रास देण्याच्या हेतून बंदर विभाग कारवाई करत आहे, असा आरोप यावेळी वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी केला. वॉटर स्पोर्ट्स सुरू करणेबाबत परवानाधारक व्यावसायिकांना जिल्हाधिकारी यांनी कोरोना खबरदारी नियमावली जाहीर केली. याची प्रत बंदर विभाग मुंबई कार्यालयाला सादर झाली. ती स्वीकारली गेली. असे असताना कोरोना खबरदारी नियमावली नाही असे सांगत बंदर विभाग कोणत्या नियमाने कारवाई करते. आमच्याकडे काही जणांकडे बोट सर्वे सर्टिफिकेट नाही म्हणून कारवाई होत असेल तर आम्ही सर्वे रक्कम भरली मात्र बंदर विभाग सर्वे विभागाकडून यावर्षी सर्वे झाला नसेल तर यात आमची काय चुक असाही प्रश्न काही व्यवसाईकानी उपस्थित केला आहे. १२ रोजी ठिय्या आंदोलन छेडणार हा आमचा ठाम निर्णय असल्याचे व्यवसायिकानी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page