ताज ऑटोकेअर आणि सर्व्हिसिंग सेंटरच्या नव्या दालनाचे शानदार उद्घाटन

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत ताजुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

*💫सावंतवाडी दि.११-:* शहरात गेली १५ वर्षाहून अधिक वर्ष लोकांना प्रामाणिकपणे सेवा देणारे सावंतवाडीतील प्रसिद्ध *”ताज ऑटोकेअर आणि ॲक्सेसरीज सेंटर”* हे नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. या दालनात एकाच छताखाली गाड्यांचे सुशोभिकरण करण्यासाठी लागणारे *हायटेक* कंपनीचे दर्जेदार साहित्य उपलब्ध होणार आहे. या दालनाचे उद्घाटन सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ताजुद्दिन शेख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, अमित पोकळे, बंटी उसगावकर, डॉ. गोविंद जाधव, तौकिर शेख, मौसिन शेख, जितू पंडित, रियाज मलानी आदी उपस्थित राहणार असून याबाबतची माहिती ताज ऑटोकेअर चे मालक तौसिफ शेख यांनी दिली आहे. यावेळी ते म्हणाले, गेली १५ वर्षाहून अधिक काळ आम्ही ताज ॲक्सेसरीजच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहोत. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही या सेंटर चे खास दालन तयार केले असून, त्यामुळे आता खरेदी करता येणारी वस्तू ग्राहकांना पाहता सुद्धा येणार आहे. यामध्ये सिटकव्हर, लॅमिनेशन, उश्या, कार साऊंड सिस्टीम अशा प्रकारच्या विविध एकापेक्षा एक दर्जेदार आणि प्रसिद्ध कंपनीची उत्पादने मिळणार आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे या वस्तूंवर एक वर्षाची वॉरंटी देखील असणार आहे. या सर्वांबरोबरच येथे गाड्या धुणे, कोंटींग, पॉलिश, आदी सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. आपल्या गाड्यांसाठी ॲक्सेसरीज खरेदीसाठी नागरिकांनी ताज ऑटोकेअर सर्व्हिसिंग सेंटर संचयनी बिल्डिंगच्या पाठीमागे येथे भेट द्यावी असे आवाहन सेंटर चे मालक तौसिफ शेख यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ८८८८१५५२३९ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page