प्रकाश झोतात न आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र

*💫वेंगुर्ले दि.१३-:* वास्तविक सर्वांना युपीएससी-एमपीएससी किंवा मोजक्याच परीक्षा माहीत असतात. या वर्षीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिविल सर्विसेस परीक्षेत भूमिपुत्रांची निवड झाली. एमपीएससी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशोगाथा वाचावयास मिळत नाहीत. अशातच शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी एक अवलिया तिमिरातुनी तेजाकडे* या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मोफत मार्गदर्शन देऊन येत्या…

Read More

जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज परब(काळसेकर) यांचे दुःखद निधन….

*💫कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज भिवा परबकाळसेकर रा.वेतळबाबर्डे कुडाळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद काल रात्री ८वाजता निधन झाले. वारकरी संप्रदायात ते काळसेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ४७ वर्षे पंढरपूर माघावारी व ५ वर्षे पंढरपूर आषाढि वारी पायी केली.ते वेतळबाबर्डे दिंडी चे प्रमुख होते. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना संप्रदायातील मानाचा…

Read More

चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

केंद्रीय विमान राज्यमंत्री हरदीप पुरी यांचे माजी मंत्री सुरेश प्रभू याना आश्वासन *💫सिंधूदुर्गनगरी दि.१३-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्वासन केंद्रीय विमानन राज्यमंत्री हरदीप पूरी यानी माजी केंद्रीय मंत्री खा सुरेश प्रभू यांना १२ डिसेबर रोजी दिले आहे. याबाबत खा प्रभू यानी ३ डिसेबर रोजी लेखी…

Read More

शरद पवारांना संघटना भक्कम करून साथ द्या-अविनाश चमणकर

*💫वेंगुर्ला दि.१३-:* देशात राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा दिवस आहे. याच दिवसापासून पक्ष संघटने बरोबरच शरद पवार यांचे हात मजुबुतीसाठी बळकटी मिळते. हि पक्ष संघटना करताना महिला व पुरूष कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास लॉटरी ठेवण्यांत आलेली असून प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटी स्थापन करून शरद पवार यांचे…

Read More

वेंगुर्ला तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा

*💫वेंगुर्ला दि.१३-:* शासनाच्या “पाणी अडवा पाणी जिरवा” या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वेंगुर्ले कडून वायंगणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. दरवर्षी वेंगुर्ला ग्रामसेवक युनियन तर्फे तालुक्यात एका ओहोळावर वनराई बंधारा बांधला जातो. त्यानुसा हा वनराई बंधारा वायंगणी येथे बांधण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा पाटील, कृषीअधिकारी विद्याधर सुतार, विस्तार अधिकारी भास्कर…

Read More

पाणीप्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक

दोघांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर मनसे चे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.१३-:* नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडला असून, डिसेंबर महिन्या पासून शहरात एक वेळ पाणी पुरवठा केला जाईल अशी घोषणा करून सत्ताधारी व विरोधक…

Read More

ट्रक चालक चाकू हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी…..

*💫सावंतवाडी दि.१३-:* लूटमारीच्या उद्देशाने सावंतवाडी शहरात काल सकाळी जिमखाना येथे एका टेम्पो चालकाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही संशयित चंदन आडेलकर ( २७), अक्षय भिके (२८) या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने दोन्ही संशयित आरोपींना…

Read More

स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सावंतवाडी येथे साजरी

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी या ठिकाणी स्वर्गीयवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती काल दिनांक १२ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी सावंतवाडी तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते . प्रथमतः लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वर्गवासी नेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवन प्रवास व संघर्ष प्रवास याविषयी…

Read More

सिंधुदुर्ग पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक यशाचा तुरा

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या चौकस तपासाची पोलीस दलाने अनुभवली झलक सावंतवाडीतील ट्रक ड्रायव्हर चाकू हल्ल्यातील आरोपी चौविस तासात गजाआड *💫सावंतवाडी दि.१२ प्रसन्न गोंदावळे-:* आरोपी कितीही हुशार असला तरी खाकीच्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाही याचा दाखला पुन्हा एकदा सिंधुदुर्ग पोलीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दिला आहे .पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या चौकस मार्गदर्शनाखाली चौफेर तपासाची सूत्रे…

Read More

कोरोनानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत संपन्न

*जिल्ह्यातील दाखल व दाखलपूर्व ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये समझोता;२ कोटी ५४ लाख ७२ हजार ९२३ रुपये वसूल *💫सिंधूदुर्गनगरी दि.१२-:* कोरोना कहरा नंतर आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये आज शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समझोता झाला आहे. यातून एकूण २…

Read More
You cannot copy content of this page