*💫सावंतवाडी दि.१३-:* लूटमारीच्या उद्देशाने सावंतवाडी शहरात काल सकाळी जिमखाना येथे एका टेम्पो चालकाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही संशयित चंदन आडेलकर ( २७), अक्षय भिके (२८) या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने दोन्ही संशयित आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासाठी विशेष सरकारी वकील स्वप्नील कोरगावकर यांनी युक्तिवाद केला आहे.
ट्रक चालक चाकू हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी…..
