पाणीप्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक

दोघांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर मनसे चे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांचा आरोप

*💫सावंतवाडी दि.१३-:* नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडला असून, डिसेंबर महिन्या पासून शहरात एक वेळ पाणी पुरवठा केला जाईल अशी घोषणा करून सत्ताधारी व विरोधक यांनी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. अशी टीका मनसे माजी उपजिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी केली आहे. धरणात मुबलक पाणी साठा असताना देखील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेली घोषणा चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. पाणी पुरवठा करण्याच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळा ह्या महिला वर्गासाठी गैरसोयीच्या असून शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याच्या घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी मनसेच्या शहर शाखेकडून मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारू असा इशारा अँड अनिल केसरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page