*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी या ठिकाणी स्वर्गीयवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती काल दिनांक १२ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी सावंतवाडी तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते . प्रथमतः लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वर्गवासी नेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवन प्रवास व संघर्ष प्रवास याविषयी वसंत गर्कळ , राजाभाऊ कांगणे , दशरथ सांगळे , प्रकाश आव्हाड, प्रविण सानप, ओम आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रवीण सानप, संध्या मुंढे / सानप, वसंत गर्कळ , प्रकाश आव्हाड , दशरथ सांगळे , संदीप खेडकर, ओम आघाव , बापूसाहेब पोटे , अतुल खेडकर, राजाभाऊ कांगणे आदी विविध क्षेत्रांतील वंजारी समाज बांधव उपस्थित होते . सदर कार्यक्रमासाठी प्रवीण सानप यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सावंतवाडी येथे साजरी
