जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या चौकस तपासाची पोलीस दलाने अनुभवली झलक सावंतवाडीतील ट्रक ड्रायव्हर चाकू हल्ल्यातील आरोपी चौविस तासात गजाआड
*💫सावंतवाडी दि.१२ प्रसन्न गोंदावळे-:* आरोपी कितीही हुशार असला तरी खाकीच्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाही याचा दाखला पुन्हा एकदा सिंधुदुर्ग पोलीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दिला आहे .पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या चौकस मार्गदर्शनाखाली चौफेर तपासाची सूत्रे हलवून शनिवारी सकाळी सावंतवाडी शहरात ट्रक ड्रायव्हर वर झालेल्या चाकूहल्ल्यातील आरोपिंच्या चौविस तासात मुसक्या आवळून खाकीची शान आणखीनच उंचावण्याची कर्तबगारी केली आहे. याप्रकरणी खुद्द सावंतवाडी शहराला लागून असलेल्या माजगाव येथील चंदन उर्फ सनी अनंत आडेलकर ( वय – २७ ) व म्हापसा गोवा येथील अक्षय भिके ( २८ ) याना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत संबंधितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून संशयितांच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे शनिवारी सकाळी कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकावर दोघा अज्ञातांनी चाकू हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली होती .त्यामुळे संशयित आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते . आणि हे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांचा आत्मा असलेल्या स्थानिक गुन्हा अणवेशन विभागाच्या पथकाने लिलया पकडून चौविस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आणि कानून के हाथ बहुत लंबे होते है हे दाखवून दिले . त्यामुळे पोलिसांवरील विश्वासहर्ता वाढली असून खाकीची शान जनमानसात आणखीनच उंचावली आहे .ही धडक कारवाई एलसीबीच्या पथकानं केली असून पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन शेळके, आशिष गंगावणे, प्रविण वालावलकर, प्रमोद काळसेकर, सुधीर सावंत, चंद्रकांत पालकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.