कोरोनानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत संपन्न

*जिल्ह्यातील दाखल व दाखलपूर्व ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये समझोता;२ कोटी ५४ लाख ७२ हजार ९२३ रुपये वसूल

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१२-:* कोरोना कहरा नंतर आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये आज शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समझोता झाला आहे. यातून एकूण २ कोटी ५४ लाख ७२ हजार ९२३ रुपये वसूल करण्यात आले आहेत विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत दर तीन महिन्यानी राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. मात्र मार्च महिन्या पासून राज्यात कोरोनाचा कहर पसरल्याने राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली नव्हती. मात्र आता कोरोना चा कहर कमी झाल्याने तब्बल दहा महिन्यानंतर आज शनिवारी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. आपापसातील वादांना तडजोडीने पूर्णविराम देण्यासाठीच्या या लोकअदालतीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयासह एकूण आठ न्यायालयांमध्ये दाखलपूर्व ४१४७ व दाखल १४१४ अशी एकूण ५५६१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दाखल पूर्व ३७८ प्रकरणांमध्ये समझोता झाला आहे. यामधून ३९ लाख ९५ हजार ४७ रुपये वसूल करण्यात आले. तर दाखल प्रकरणांपैकी ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामधून २ कोटी १७ लाख ७७ हजार ८७६ रुपये वसूल करण्यात आले आहेत. दाखल पूर्व व दाखल अशा एकूण ४६६ प्रकरणांमध्ये समझोता झाला असून त्यातून २ कोटी ५४ लाख ७२ हजार ९२३ रुपये वसुल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गनगरी येथे तिन मंडळांमधून ही लोकअदालत घेण्यात आली.

You cannot copy content of this page