
कृत्रिमरित्या फळे पिकवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा- संजू परब
*ð«सावंतवाडी दि.१३-:* शहरात रासायनिक द्रव्यांची फवारणी करून कुत्रिमरित्या फळे पिकवून त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. ही बाब प्रत्यक्ष दर्शनी आली असून, अशी फळे आरोग्यास अपायकारक असून, अनधिकृतपणे व्यापारी अशी फळे विकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.