*💫सावंतवाडी दि.१३-:* बनावट जमिनीचे कागदपत्र तयार करून बेकायदेशीररित्या जमिनीचे विक्री व्यवहार केल्या प्रकरणी काल संध्याकाळी आणखी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. संजय गावडे आणि मोहन गवस या दोन्ही संशयित आरोपींची मदत घेऊन मुख्य संशयित आरोपी गौरीश टोपले यांनी त्या जमिनीसंदर्भात खोटे कागदपत्र तयार केली होते. याबाबत फिर्यादी अनिल हेर्ले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयित मुख्य आरोपीसह आणखी एक संशयित आरोपीला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. तर काल अटक करण्यात आलेल्या आणखी दोन संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच न्यायालयाने दोघांचा ही अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज देखील फेटाळला आहे. याकामी सरकारी पक्षाकडून स्वप्नील कोरगावकर यांनी काम पाहिले.
*बेकायदेशीररित्या जमीन विक्री प्रकरणी आणखी दोन संशयिताना चार दिवसांची पोलीस कोठडी*
