तब्बल पंधरा हजार रुपये व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट मुळ मालकाला दिले परत…

सोनुर्ली येथील दिगंबर नाईक याचा प्रामाणिकपणा…

*💫सावंतवाडी दि.१३-:* पंधरा हजार रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट रस्त्यावर सापडल्यावर आधार कार्ड वरील नंबर वरून संपर्क साधत कास येथील तुषार भाईप या मुळ मालकाला परत देण्याचा प्रामाणिकपणा सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवकाने केला. दिगंबर पांडुरंग नाईक असे त्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी दिगंबर नाईक हे आपल्या कामानिमित्त बांदा येथे गेले होते. आपले काम आटोपल्यानंतर घरी परतत असताना बांधा कट्टा कॉर्नर येथील एका दुकानाजवळ रस्त्यावर पाकीट पडल्याचे त्यांना दिसून आले लागलेच त्यांनी ते पाकीट उचलले त्यामध्ये पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच विविध बँकांचे एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड लायसन्स आधी इतर महत्वाची कागदपत्रे होती.त्याने नजीकच्या दुकानदारांकडे याबाबत चौकशी करून खात्री केली मात्र आपले पाकिट नसल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्याने आत मध्ये असलेल्या आधार कार्ड च्या मागील नंबर वरून संपर्क साधला असतात कास येथील तुषार लक्ष्मण भाईप यांनी आपलेच पाकीट गहाळ झाल्याचे सांगितले. त्यांनतर दिगंबर नाईक यांनी खात्री व ओळख पटवून सदरचा पाकीत त्याच्या ताब्यात दिले. भाईप हा युवक गोवा येथे खासगी कंपनीत नोकरीला असतो आज तो बांधा येथे आला असता त्यांचे पाकीट गहाळ झाले होते तो पालिकेची शोधाशोध करत असतांच दिगबर याला सापडलेले पाकीट परत केल्याने त्याने खुप खुप आभार व्यक्त केले. शिवाय दिगंबर याच्या प्रामाणिकपणाबद्दलही येथील व्यापारी वर्गानी कौतुक केले.

You cannot copy content of this page