मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दर्शक फलकाचे अनावरण

*भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण; सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित*

*💫सावंतवाडी दि.१३-:*.मनोहर मनसंतोषगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दाखवण्यात आलेल्या फलकाचे आज भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. त्यावेळी सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजु परब, सांगेलीचे पंढरी राऊळ, शिरशिंगेचे कार्यकर्ते सुनिल राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. धवडकी रस्त्यावर मनोहरसंतोषगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दाखवणारा फलक लावण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात पर्यटन या गडावर जाण्यासाठी इच्छुक असतात परंतु, दिशा दर्शक फलक नसल्याने मार्ग चुकत असल्याचे शिरशिंगे ग्रामस्थच्या लक्षात आल्याने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय घोषात हे अनावरण करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page