शोभिवंत माशांचे पालन एक किफायतशीर व्यवसाय- सतिश सावंत

मालवण दि..१३-: शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय असून आजच्या आधुनिक युगात मस्य पालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे यावे या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी येथे बोलताना दिली कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद भवन ट्रस्ट सिंधुदुर्ग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संशोधन संवर्धन प्रकल्प महाविद्यालय मच्छ उद्यान विद्या उद्यानविद्या महाविद्यालय मुंबई अंतर्गत एक दिवसीय शोभिवंत मत्स्य पालन विषयक कार्यशाळा पार पडली त्यावेळी उदघाटन प्रसंगी श्री सावंत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हा बँकेचे संचालक तथा शरद  भवन ट्रस्ट चे विश्वस्त व्हीक्टर डांटस, सौ जान्हवी सावंत प्रकल्प प्रमुख व मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन सावंत व मालवण पंचायत समिती सदस्य विनोद आळवे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री सावंत पुढे म्हणाले जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन कृषी पशु संवर्धन यासाठी सहकार्य केले जात आहे खरं तर शोभिवंत मत्स्य पालन साठी आता शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे असे सांगत ते म्हणाले,कोकण किनारपट्टीला एक वेगळे महत्त्व आहे .येथील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आता वेगळ्या धर्तीवर मत्स्य पालन व्यवसाय करणे ही सुलभ झाले आहे .हे शोभिवंत मत्स्य पालनच्या माध्यमातून येथील बांधवांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी खरंतर शोभिवंत मत्स्य पालन ही संकल्पना व्हिक्टर डॉन्टस यांनी हाती घेतली आणि ती राबवली ही बाब स्तुत्य आहे माजी कृषिमंत्री तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला हे चांगलेच असल्याचे सांगत श्री भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तर शरद भवन ट्रस्टचे विश्वस्त श्री व्हिक्टर डॉन्टस यांनी सिंधुदुर्गातील मत्स्य पालन शेतकरी यांना शोभिवंत मत्स्य पालन चे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचा हा एक प्रयोग आहे खरंतर येथील मत्स्य शेतकऱ्यांना हे एक नवं दालन उपलब्ध झाले आहे याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी डॉक्टर नितीन सावंत यानीही मार्गदर्शन केले या प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्या तील २४ निवडक शेतकरी व महिला सहभागी झाले होते यावेळी डॉ.मनोज घुघूसकर, कृपेश सावंत, जिल्हा बँकेचे  अधिकारी किरणकुमार गावडे ,सोमा पालव अंकित फोंडेकर, श्रीमती अंणसूरकर यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page