आंबोली,ता. १०: तलाठी सुमित घाडीगावकर यांच्या महसूल विभागाच्या अन्यायविरोधात उपोषणाला जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित केले. त्यांच्या वेतन तसेच बदली बाबत आश्वासन पत्र दिल्याने घाडीगावकर यांनी उपोषण स्थगित केले. उपोषणाला आंबोलीतील बबन गावडे,काशीराम राऊत,नारायण कोरगावकर,सुनील चव्हाण,संतोष उर्फ बुधाजी पाताडे,काशिराम गावडे,ऍड. राजा गावडे,महेश सावंत(निगुडे), रवींद्र ओगले यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
तलाठी घाडीगावकर यांचे जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राने उपोषण स्थगित…
