जिल्हा नियोजन समिती सभेचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-: जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 माहे जानेवारी 2026 अखेर खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 व सन 2025-26 स्थानिक स्वराज्य संस्थाकडील माहे जानेवारी 2026 अखेर खर्चाचा अहवाल सादर करणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना सन 2025-26 माहे जानेवारी २०२६ अखेर खर्चास मान्यता देणे, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्रारूप आराखड्यास मान्यता देणे तसेच ‘क’ वर्ग यात्रास्तर घोषित करणे इ. विषयांचा समावेश या बैठकीत असणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी सांगितले आहे.

००००००

You cannot copy content of this page