⚡बांदा ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांद्याचा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर बांदाची यावर्षीची गणेशोत्सवाची नियोजन बैठक विठ्ठल मंदिरात संपन्न झाली. यावेळी गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी नियोजन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षपदी अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, सचिव दादा पावसकर तर खजिनदारपदी विठ्ठल उर्फ भाऊ वाळके यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
या बैठकीत गणेशोत्सव संदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. विविध कार्यक्रम, रक्तदान शिबीर आणि पूजा, नैवेद्य यांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीप्रसाद वाळके, भाऊ वाळके, सुशांत पांगम, सर्वेश गोवेकर, प्रशांत पांगम, साईप्रसाद काणेकर, राकेश केसरकर, अजय महाजन, प्रथमेश गोवेकर, साईराज साळगावकर, साईराज पावसकर, अजिंक्य पावसकर, अमेय पावसकर, नंदू गोवेकर, बिपीन येडवे, ज्ञानेश्वर येडवे, मिलिंद सावंत, अक्षय मयेकर, आशुतोष भांगले, निखिल मयेकर, संदेश पावसकर, सुनील नाटेकर, अनिल नाटेकर, सिद्धेश शिरोडकर, अक्षय नाटेकर, गौरव महाजन, गौरव नाटेकर, सुधीर शिरसाट, बाबा काणेकर, मंदार कल्याणकर, अर्णव स्वार, ओंकार नाडकर्णी, राज हरमलकर, प्रतीक नार्वेकर, संकल्प केसरकर, शुभम पांगम, मयुरेश महाजन, अनिकेत येडवे, बाबल नार्वेकर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर बांदाची यावर्षीची गणेशोत्सवाची नियोजन बैठक संपन्न…!
