⚡दोडामार्ग ता.१०-:
तालुक्यात ‘आबाजी’ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश अर्जुन दळवी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बोडदे–टेंबवाडीसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
दळवी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच माजी सैनिक बँकेचे चेअरमन म्हणून काम केले होते. सध्या ते भाजपमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपासून आजारी असलेल्या दळवी यांच्यावर गोव्यात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
‘आबाजी’ रमेश दळवी यांचे निधन…
