⚡सावंतवाडी, ता. १०-: शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडीत “बेक्स अँड ब्रूज’” या नवीन कॅफेचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. मोती तलावाजवळील पंचम हाइट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कॅफे सुरू होत आहे.
ग्राहकांना ताज्या बेकरी पदार्थांसह विविध प्रकारची कॉफी, बर्गर, पिझ्झा, सँडविचेस आदी पदार्थांचा आस्वाद एका आरामदायी वातावरणात घेता येणार आहे. “Sip • Savour • Satisfy” या संकल्पनेवर आधारित हे कॅफे मित्रपरिवार व कुटुंबीयांसाठी आकर्षण ठरणार असल्याची माहिती परब कुटुंब्यांकडून देण्यात आली आहे दिली.अधिक माहितीसाठी 7709006314 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच @BakesAndBrewsCafe या इन्स्टाग्राम पेजवर कॅफेची माहिती उपलब्ध आहे.
