मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना:प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार..
⚡कणकवली ता.१०-:
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्याच्या उद्देशाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे. योजना तयार करण्यासाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मत्स्य दिनी ही योजना लागू करता येईल या दृष्टीने काम करा अशा सूचना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केले.
राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून मत्स्य विभागाच्या माध्यमातून दिनदर्शिकेचे प्रकाशन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री नितेश राणे यांना यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका चे माहिती घेतली आणि समाधानी व्यक्त केले तर स्वच्छ किनारी स्वच्छ समुद्र या दृष्टिकोनातून प्लास्टिक मुक्त कोळीवाडा असा उपक्रम राबवणीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. पावसाळ्यात मच्छीमारी होत नाही या काळात बर्फाचे कारखाने, किंवा बर्फ तयार करणारे छोटे-मोठे युनिट मच्छीमारांकडून कसे तयार करता येतील यावर विचार करावा मच्छीमारांना श्रम कार्ड आणि किसान कार्ड देण्यासाठी उपक्रम हाती घ्यावा मच्छीमारांसाठी नारळी पौर्णिमेचा सण मोठा असतो यावेळी मत्स्य विभागाने स्वतंत्ररित्या उपक्रम हाती घ्यावा. माशाच्या कातडी पासून माशाच्या हाडापासून बनवले जाणारे ज्वेलरी अधिक प्रमाणात निर्मितीवर करू द्यावा मुंबईतील काळा घोडा या ठिकाणी त्याचे प्रदर्शन करावे मंत्रालयाच्या ठिकाणी त्याची प्रदर्शन करावे असे सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. निर्मल सागर अभियान राबवण्यासंदर्भातही यावेळी निमंत्रण नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी पदुमचे सचिव रामा स्वामी, मत्स्य विभागाचे सचिव किशोर तावडे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.