जळगावातील शेतकऱ्याने केला सर्वाधिक विमान प्रवास…

फ्लाय91 च्या पुणे-जळगाव मार्गावर तब्बल ५० वी फेरी..

कुडाळ : जळगाव जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी मानस कुलकर्णी यांनी २ जुलै रोजी जळगाव-पुणे मार्गावर त्यांचा ५०वा FLY91 विमान प्रवास पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे फ्लाय91 विमान कंपनी तर्फे केक कापून अभिनंदन करण्यात आले.
जळगाव ते पुणे मार्गावर असलेल्या एकमेव FLY91 चा विमानसेवेचा प्रवास सुमारे १ तास १५ मिनीटांचा आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक या गावातील प्रगतशील शेतकरी मानस कुलकर्णी हे आपल्या शेतात केळी, कपाशी, तूर, गहू, मका, हरभरा आणि कांदा अशी विविध पिके पिकवतात. जळगाव ते पुणे या मार्गावर त्यांनी आतापर्यंत ५० वेळा प्रवास केला आहे आणि यानिमित्ताने FLY91 कंपनीने त्यांचा जळगाव विमानतळावर सत्कार केला.
त्यांच्या ५०व्या प्रवासाच्या आधी FLY91 च्या कर्मचाऱ्यांनी केलेला हा लहानसा पण जिव्हाळ्याचा सत्कार कुलकर्णींसाठी एक सरप्राइज आणि आनंददायी गोष्ट होती. “हे माझे FLY91 सोबतचे ५०वे उड्डाण आहे. या प्रवासाची मला खूप उत्सुकता आहे,” असं त्यांनी विमानात चढण्यापूर्वी सांगितलं.
कुलकर्णी यांचा पुण्याशी असलेला संबंध हा वैयक्तिक आहे, व्यवसायिक नाही. त्यांची पत्नी आणि मुलगा २०१३ मध्ये मुलाच्या शिक्षणासाठी पुण्यात गेले. मुलगा आता मेकॅनिकल इंजिनिअर असून जर्मनीला जाणार आहे. कुलकर्णी स्वतः गावातच राहून शेती सांभाळतात, पण दरम्यान आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वारंवार पुणेवारी करतात. “पूर्वी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी १२-१३ तास लागायचे. पण आता FLY91 मुळे हे अंतर फक्त १ तास १५ मिनिटात पार करता येतं,” असं ते सांगतात.
FLY91 ने जळगाव-पुणे मार्गावर दररोज सेवा सुरू केली तेव्हापासूनच कुलकर्णींना नियमीत पुण्याला जाणं शक्य झालंय. गोव्यात मुख्यालय असलेली FLY91 ही विमान कंपनी भारतातील दुर्लक्षित प्रादेशिक विमानतळांना जोडण्यावर लक्ष केंद्रित करते. केंद्र सरकारची UDAN योजना – ‘उडे देश का आम नागरिक’ ह्या योजनेच्या यशाचें एक उदाहरण म्हणजेच मानस कुलकर्णी.
याबाबत FLY91 चे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी सांगितले, प्रत्येक नवीन मार्ग आम्ही प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर करण्यासाठी सुरू करतो, विशेषतः दुर्लक्षित भागातील लोकांसाठी. FLY91 नेहमीच अशा प्रादेशिक मार्गांना प्राधान्य देते.
५०व्या प्रवासानंतर कुलकर्णी यांनी FLY91 साठी एक खास टॅग लाइन पण तयार केली आहे, ती म्हणजे ‘FLY91 – Connecting Families (कुटुंबांना जोडणारी विमानसेवा)’ आणि हे मला मनापासून वाटतं,” असं त्यांनी आनंदाने नमूद केलं.

You cannot copy content of this page