⚡सावंतवाडी ता.१०-: येथील शहर भाजप च्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात विविध क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या गुरुजनांचा आशीर्वाद घेत गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यभरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना हा कार्यक्रम घेतला. सावंतवाडी शहरातही शहर मंडल अध्यक्ष श्री आडीवरेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत हा कार्यक्रम घेतला. यामध्ये विविध क्षेत्रात चांगले काम करणारे उदाहरणार्थ शिक्षक, डॉक्टर धार्मिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, योगा शिक्षक आदी विविध व्यक्तींची भेट घेत त्यांना गुरुस्थानी मानत त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी माजी नगरसेवक दिपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक परिमल नाईक, विराग मडकईकर,दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, मिसबा शेख, मेघना साळगावकर, अमित गवंढळर, राघवेंद्र चितारी उपस्थित होते.